सांताक्रुज मध्ये कलाविष्कार
सांताक्रुज मध्ये कलाविष्कार
मुंबई :आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सांताक्रुज पश्चिम महानगरपालिका माध्यमिक शाळा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम(कलाविष्कार) पार पडले.
कार्यक्रमाला एच वेस्ट विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रकांत भंडारी तसेच शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री मनोज तिवारी श्री.प्रकाश ठाकूर आणि श्री. कमर सय्यद इकबाल यांची उपस्थिती लाभली.
शाळेचे मुख्याध्यापक निमंत्रक श्री राठोड टी.पी सर्व शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मेहनतीने कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या पार पडला.
सरस्वती पूजन दीप प्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार, वार्षिक अहवाल वाचन, गुणवंत विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्वात शेवटी आभार प्रदर्शन सर्व नियोजित कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या संपन्न झाला.
आपले सर्वांचे लाडके प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रकांत भंडारी सरांनी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना पुढील उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत अथक मेहनतीचे फळ यासंदर्भात इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री तिवारी सर श्री ठाकूर सर आणि श्री.कमर सर यांनी देखील शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्याकरता शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच शाळेतील निवृत्त माजी मुख्याध्यापक श्री शुक्ला सर यांचे मार्गदर्शन देखील विद्यार्थ्यांना लाभले.
राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत सहभाग झालेली कुमारी जेनिशा तिचे कौतुक मान्यवरांच्या हस्ते झाले.
महाऊर्जा राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कुमार मनोज कनोजिया याचे देखील अभिनंदन कौतुक आणि सत्कार करण्यात आला.
टाटा बिल्डिंग इंडिया शाळे तील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल उर्दू सकाळ अधिवेशनातील कुमार अमन पठाण याला देखील गौरवण्यात आले. इयत्ता दहावी माजी विद्यार्थिनी कुमारी नेहा सिराज खान हिला गौरवण्यात आले
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा श्रीमती राजेश्वरी पटेल यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री अनिल सिंग यांनी राष्ट्रगीता नंतर कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
एकंदरीत सर्व नियोजित कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.
Comments
Post a Comment