नैसर्गिक अपंग सेवा संघ चा 23 वा वार्षिक समारंभ संपन्न .
नैसर्गिक अपंग सेवा संघ चा 23 वा वार्षिक समारंभ संपन्न .
मुंबई: सामाजिक संघटना नैसर्गिक विकलांग तर्फे अंधेरी पुर्व येथील दादल बँक्वेट सभागृहात मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवनजी यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ आयोजित करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थानिक आमदार मुरजी पटेल (काका), सामाजिक कार्यकर्ते अश्विन जैन, मुंबई भाजप उपाध्यक्ष अखिलेश सिंह, नगरसेविका सुधा सिंह आणि सद्गुरु फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष गणेश अग्रवाल यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांमध्ये दिनेशचंद्र उपाध्याय (तंत्रज्ञ), संतोष रहाटे (सामाजिक कार्यकर्ते), देवेंद्र तिवारी, अधिवक्ता सतीश मिश्रा, सामाजिक कार्यकर्ते आनंद पाठक, राहुल यादव, नवीन शुक्ला आणि इतर मान्यवरांचा समावेश होता. अंधेरी पूर्व येथील नवनिर्वाचित नगरसेवक ममता पंकज यादव, दिशा संध्या सुनील यादव आणि नगरसेवक प्रकाश मुसळे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात संस्थेने माझगाव कोर्ट बार असोसिएशनचे पाच वेळा अध्यक्ष राहिलेले आणि अपंगांच्या कल्याणासाठी काम करणारे कांतिलाल संघोई यांना स्मृतिचिन्ह, शाल आणि नारळ देऊन सत्कार करण्यात आले . या कार्यक्रमात दोनशे अपंगांना दहा व्हीलचेअर आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यात संघटनेचे अध्यक्ष टी.एन. दुबे, उपाध्यक्ष प्रभाकर शुक्ला, कामगार नेते विकास तिवारी, सरचिटणीस अॅड. अशोक मिश्रा, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव, सचिव प्रशांत चारी, नवीन शुक्ला, विनय दुबे, संतोष दुबे, गुरुजस यादव, पवन दुबे, पंकज मिश्रा, अभिषेक राय, मीना पाटेकर, प्रशांत दुबे, राजेश शर्मा, गुरुजस यादव इत्यादींची भूमिका कौतुकास्पद होती.
Comments
Post a Comment