श्री सत्यनारायण पूजन व साई भंडान्याचे आयोजन
श्री सत्यनारायण पूजन व साई भंडान्याचे आयोजन
मुंबई :साई दातार सामाजिक विकास सेवा संस्था यांच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम येथील गिलबर्ट हिल परिसरातील साई मंदिरात श्री सत्यनारायण पूजन व साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष बजरंग दांडेकर, सामाजिक कार्यकर्ते कुशल संगोई, नागराज दांडेकर आणि सुरेश दांडेकर यांनी केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पूजन पार पडले आणि त्यानंतर साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमामुळे समाजात धार्मिक एकोप्याचा संदेश पसरवला गेला असून, आयोजकांनी भाविकांची सेवा करून एक सामाजिक बांधिलकी जपली.
Comments
Post a Comment