चांदिवली काजूपाडा येथे युवा प्रतिष्ठान कुर्ला तर्फे माघी गणेशोत्सवाचा श्रींचा आगमन सोहळा उत्साहात साजरा

चांदिवली काजूपाडा येथे युवा प्रतिष्ठान कुर्ला तर्फे माघी गणेशोत्सवाचा श्रींचा आगमन सोहळा उत्साहात साजरा

चांदिवली काजूपाडा येथे युवा प्रतिष्ठान, कुर्ला तर्फे माघी गणेशोत्सव निमित्ताने श्री गणेशाचे आगमन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सदस्य तसेच परिसरातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती लाभली.

यावेळी मंडळाचे सल्लागार आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, एनसीपी नेते बाबू बत्तेली, एड. कैलास आगवणे, रियाझ मुल्ला, रत्नाकर शेट्टी, प्रतीक प्रजापती, मंडळाचे अध्यक्ष शुभम कांबळे, खजिनदार दीपक गायकवाड, उपाध्यक्ष महेश कचवे, उपखजिनदार समीर नाजरकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मंडळाचे सदस्य कैलास शिंदे, सोनपण मोडले, संदीप शिंदे, करेन यादव, सौरभ जाधव, आदर्श प्रजाती, भावेश जाधव, हरश कुठे, कल्पेश सोळंकी, केवेल जाधव, वैभव मडके, अक्षय शेजाळ, शिवम शुक्ल यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले.

गणेश आगमनाच्या सोहळयाला स्थानिक रहिवाशांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. भक्तांच्या "गणपती बाप्पा मोरया!" च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगितीशिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती