रामअवतार यादव यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न*

*रामअवतार यादव यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न*
 मुंबई : 29 एप्रिल रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सायन येथील जोगेलकरवाडी शाळेच्या सभागृहात ज्येष्ठ शालेय शिक्षक, लेखक आणि साहित्यिक रामअवतार यादव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  डॉ.अमर बहादुर यादव यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ  माजी प्रशासकीय अधिकारी रामहित यादव तर प्रमुख पाहुणे म्हणून एफ/उत्तर विभागाचे प्रशासकीय अधिकारी किसन बाजीराव पावडे , माजी शिक्षण निरीक्षक जगदीश नारायण गायकवाड, राजदेव यादव,शिक्षण निरीक्षक किरण डिसिल्वा,  कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी, जनसृष्टी सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.अमर बहादुर पटेल, लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव उपस्थित होते.
 अंजू शर्मा, मुख्याध्यापक देवेंद्र प्रताप सिंग, प्रा. कोमल यादव यांनी यादव सरांचे व्यक्तिमत्व आणि कार्य याविषयी ज्वलंत विचार व्यक्त केले.
 यावेळी थोर विचारक , आलोचक माजी प्राचार्य गिरधर यादव, राजधर यादव, हराया यादव, हरेंद्र सहदेव यादव, गुलाब यादव, आलोक सिंग, एफ /उत्तर विभागाचे शिक्षक सेनेचे  अध्यक्ष विनोद राठोड, कलावंत लोकप्रिय शिक्षक  पराग साळवे, अनिल  कोरी, जितेंद्र दमाहे,शिक्षक सभेचे लोकप्रिय सहसचिव ओमप्रकाश बैजनाथ यादव उपस्थित होते.आभार  शिक्षक सेनेचे  कार्याध्यक्ष उपेंद्र राय यांनी व्यक्त केले तर शिक्षक प्रदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन केले.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन

आदर्श शिक्षक रामभाऊ लक्ष्मीबाई हरी काकड प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त.