*निवडणुका की निवडू नका*

*निवडणुका की निवडू नका* 
मतदार राजा, मतदार राजा, काय माझी ऐट,
 उमेदवार येतो पहा, माझ्या घरी थेट,

 सध्या मी राजा, मत मागणारा याचक,
 मतदान होताच मात्र, तो राजा मी याचक,

 देवतांना नमस्कार करता, दिसते तेथे कमतरता,
 गायप असतो धनुष्य रामाचा, दिसतो फक्त भाता,

 कमळावरील देवी दिसते, बसलेली कमळाविना,
 ज्या हाताने आशीर्वाद मिळतो, तो हातही दिसेना,

 मामाच्या गावी जाताना, इंजन धूर सोडत असे,
 तो कोळशाचा वास, ते दृश्य, आता झाले दिसेनासे,

 रेल्वे स्थानकात लांबून पाहता, गोल मोठे घड्याळ दिसे,
 आता मात्र डिजिटल आकडे, घड्याळाच्या जागी दिसे,

 घड्याळ इंजिन हात कमळ, नाहीसे झाले कुठे?
 अरे हे तर आपल्या उमेदवारांच्या, नावापुढे दिसे,

 कोणीही येवो, कसे ही येवो, जैसे थे राहणार,
 मतदार गरिबीत जगला, गरिबीतच मरणार,

 जाऊदे आपण का ते, घ्यावे ध्यानीमनी, 
गीत संगीत काव्य यांना,  आपले करू धनी,

                    नवोन्मेष

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न