माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रॉफी मुक्तीचा समारंभ
माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रॉफी मुक्तीचा समारंभ
मुंबई
असोसिएशन ह्या संस्थेमार्फत मस्क्युलर डिस्ट्रॉफी असलेल्या रुग्णांना एकूण (३०) इलेक्ट्रिक व्हील चेअर विथ रिमोट आणि वेन्ट मेड बायपॅप चे मोफत वितरण महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री सन्मानीय श्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्या हस्ते करण्यात आले... सदर कार्यक्रमात डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना महाराष्ट्र वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आणि एकनाथ शिंदे साहेबांचे OSD सन्मानीय श्री मंगेश चिवटे साहेब आणि त्यांची सर्व आरोग्य मित्र टीम व श्री जयंत श्री जयंत शिरीषकर साहेब संचालक मुंबई सहकारी बोर्ड ह्यांची लाखमोलाचे सहकार्य मिळाले..
Brenntag ingredients Pvt LTD ह्या कंपनीचे सर्वेसेवा सन्मानीय श्री रॉनी सर आणि CSR टीम यांच्या आर्थिक सहयोगाने... माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रॉफी मुक्तीचा असोसिएशन संस्थेच्या माध्यमातून मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त रुग्णांसाठी (₹१०१०००) (रुपये एक लाख दहा हजार रुपये) किमतीची इलेक्ट्रिक व्हीलचेअर व (₹५०,०००) (रुपये पन्नास रुपये हजार किमतीचे) 'वॅटमेड बायपॅप' मशीन मोफत विनामूल्य वितरण कार्यक्रम दिनांक - ७डिसेंबर २०२५ रोजी ठाण्यातील स्वर्गीय गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला.
मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्मीळ आजार असला तरी या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. त्यांच्या 'विलपॉवर'मुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केले. या आजारावर लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.
या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना तात्काळ १०० अतिरिक्त इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा केली. तसेच गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पोर्टेबल वेंटिलेशन उपकरणेही उपलब्ध करून देऊ असे याप्रसंगी जाहीर केले. एसटी, मेट्रो, मोनो यांसह सार्वजनिक वाहतुकीत या मुलांच्या प्रवासासाठी अनुकूल सुविधा निर्माण केल्या जातील तसेच त्यांच्यासाठी थेरपी सेंटर सुरू करण्यात येईल असे यावेळी स्पष्ट केले. या मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य टिकवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व प्रयत्न शासन आणि समाजाच्या माध्यमातून केले जातील असे याप्रसंगी नमूद केले.
यावेळी माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रॉफी मुक्तीचा असोसिएशन ह्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. मंगेश लक्ष्मी गणेश पेडामकर व सर्व कार्यकारणी सदस्य सभासद आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे, हरिश्चंद्र सावंत ,जयंत शिरीषकर व ॲड.श्री ज्ञानदेव भिंगारदेव उपस्थित होते.
Comments
Post a Comment