आईसो शांताबाई माधवराव वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरण
आईसो शांताबाई माधवराव वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरण
शिवाजी माध्यमिक विद्यालय टाकळी प्रदे येथे आज दिनांक 2/12/2025 रोजी युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी मुंबई या संस्थेच्या कालकथित अध्यक्षा आईसो शांताबाई माधवराव वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे व्हाईस चेअरमन आदरणीय जिभाऊसो. श्री राजाराम पुरुषोत्तम सूर्यवंशी संस्थेचे तज्ञ मार्गदर्शक आदरणीय श्री साळुंखे सर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम, पर्यवेक्षिका चौधरी मॅडम, सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळेस संस्थेचे तज्ञ मार्गदर्शक श्री साळुंखे सर यांनी व विद्यालयाचे शिक्षक श्री सोनवणे सर मुख्याध्यापिका पाटील मॅडम श्री सपकाळे सर या सर्वांनी आईच्या जीवनातील काही अनुभव सांगून आईंना अभिवादन करून विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
Comments
Post a Comment