बा भीमा तुझ्यामुळेच...!कवी - प्रा. संदेश वाघ

बा भीमा तुझ्यामुळेच...!
कवी - प्रा. संदेश वाघ

माणसांना गाडणाऱ्या देशात जन्मलो आम्ही माणसांना जाळणाऱ्या देशात जन्मलो आम्ही... माणसांना तोडणाऱ्या देशात जन्मलो आम्ही... माणसांना कापणाऱ्या देशात जन्मलो आम्ही... तुमच्यासारखीच माणसं आम्ही माणसाचं माणूसपण नाकारणाऱ्या देशात जन्मलो आम्ही या विश्वात माणसाला माणूसच मानलं जातं माणसाशी माणसासारखाच वागलं जातं मग इथेच असं वेगळं का वागवलं जातं? प्रश्न पडतात अनेक मनात आणि सापडतं उत्तर तुमच्या धर्म ग्रंथात ज्यांनी माणसा माणसात विषमतेचं बीज रोवलं..

बा भीमा तुझ्यामुळेच... आमच माणूसपण उमगलं जगाला तू गाडलस विषमतेला तू अव्हेरलस संस्कृतीला तू दिलस धम्माला तू प्रस्थापिलस संविधानाला एक माणूस, एक मत, एक मूल्य दिलस समस्त मानवाला तू बोधिसत्व तू मार्गदाता तू संविधानकार तू महामानव तूच आमचा मायबाप तूच शास्ता बुद्धांचा अनुयायी

बा भीमा तुझ्यामुळेच... आमचं माणूसपण नाकारणाऱ्या देशात तूच माणूसपण दिलस आम्हाला.. तूच माणूसपण दिलस आम्हाला...

(प्राध्यापक संदेश वाघ यांच्या आंबेडकरी कार्यकर्त्याच्या कविता या आगामी काव्य संग्रहातील कविता)

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न