घाटकोपर मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न

घाटकोपर  मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विभाग स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी घाटकोपर येथील साईनाथ नगर महानगरपालिका शाळा संकुलामध्ये (एन) N वॉर्ड विभागाचे विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले या प्रदर्शनाचे उद्घाटन  अधीक्षक  नंदू  नाना घारे सर, प्रशासकीय अधिकारी  वीणा सोनावणे मॅडम, विभाग निरीक्षिका सुरेखा चौहान मॅडम, रुकसाना शेख मॅडम, कैलास सरोदे सर व राजेंद्र जयस्वार सर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी साईनाथ नगर शाळेच्या शाळा प्रमुख  श्रद्धा काटे मॅडम यांनी सर्व पाहुण्यांचे लेझीमच्या समोसा स्वागत केले. भारतीय संस्कृतीचे उत्तम दर्शन पाहावयास मिळाले. अधीक्षक घारे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना भविष्यातील विज्ञान विषयक संधीचे जाणीव करून दिले व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी पूर्व भायखळा मनपा  माध्यमिक शाळेचे महापौर पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक  रामचंद्र जाधव सर व  वराडे मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम केले शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने  केले पाहिजे. अशा प्रकारचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. प्रदर्शनामध्ये महानगरपालिकेच्या इयत्ता आठवीच्या 41 शाळांनी सहभाग घेतला होता त्यामधील पहिल्या पाच क्रमांकाच्या शाळांचा सन्मान करण्यात आला. आभार व्यक्त करताना  प्रशासकीय अधिकारी विना सोनावणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात भारताचे आदर्श नागरिक बनण्याबरोबरच विज्ञान क्षेत्रामध्ये चांगले प्रगती करा अशा प्रकारचा संदेशही दिला.
 सदर कार्यक्रमांमध्ये शाळेमधील सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि यूआरसी 7 चे अनिल माने सर व सीताराम वावस्कर सर यांचे मोलाचे योगदान लाभले.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न