शिक्षक गुण गौरव आणि सह विचार सभा संपन्न
शिक्षक गुण गौरव आणि सह विचार सभा संपन्न
मुंबई :साने गुरुजी विद्यालयात दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी शालांत परीक्षा निकाल उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण अशी माध्यमिकच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न झाली . या सभेसाठी मा.उपायुक्त शिक्षण डॉ. प्राची जांभेकर मॅडम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी एसएससी निकाल वृद्धी, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, तसेच विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून शिक्षक व मुख्याध्यापकांना शैक्षणिक दिशादर्शन व प्रेरणा मिळाली.
सदर सभेत वार्षिक नियोजन,प्रश्नपत्रिका निर्मिती ,मिशन मेरिट समितीतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या सर्वांचा गौरव होऊन त्यांचे मनोबल वाढले.कार्यक्रमात मा. शिक्षणाधिकारी सुजाता खरे मॅडम यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व, शैक्षणिक नियोजनाची गरज व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा यावर भर दिला.
खान अकॅडमी तर्फे मा. अमर माळी सर यांनी विद्यार्थ्यांसाठी अँप चा प्रभावी वापर, सराव पद्धती, मॉनिटरिंग सिस्टम तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थी प्रगती कशी तपासावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अँप च्या सहाय्याने शिकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी कशी होऊ शकते याबद्दल त्यांनी माहिती दिली . कार्यक्रमाची सुरुवात उपशिक्षणाधिकारी मा. श्रीम. आरती खैर मॅडम यांच्या प्रस्तावनेनी झाली. त्यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट व विविध शैक्षणिक सुधारणा उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
सभेच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यात वाढत्या ताण–तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी तज्ञ मानसोपचारतज्ञ डॉ.विक्रम राणा सर आणि डॉ. विशाल सांगळे सर यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजनही करण्यात आले. या सत्रातून भावनिक स्वास्थ्य कसे राखावे , ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे व सकारात्मक दृष्टीकोन याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास मान.विभाग निरीक्षक श्रीम. अलमास अफरोज मॅडम तसेच मा. श्रीम. सुनीता खाडे मॅडम उपस्थित होत्या. समारोप प्रसंगी सुनीता खाडे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शैक्षणिक दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला. उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापक व प्र. मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शनातून प्रेरणा घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी होता.
Comments
Post a Comment