भादवणचा सुपुत्र बृहन्मुंबईचा मुख्य अभियंताचंद्रकांत उंडगे यांच्या नियुक्तीने परिसर आनंदाला
भादवणचा सुपुत्र बृहन्मुंबईचा मुख्य अभियंता
चंद्रकांत उंडगे यांच्या नियुक्तीने परिसर आनंदाला
भादवण गावचे सुपुत्र चंद्रकांत लक्ष्मण उंडगे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च अशा मुख्य अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे भादवणसह संपूर्ण मुंबई महानगरात समाधान व अभिमान व्यक्त केला जात आहे.
कठोर परिश्रम, प्रामाणिक सेवा आणि प्रशासकीय अनुभवाच्या बळावर उंडगे यांनी हे पद मिळवले आहे. महानगरपालिकेतील सुमारे 31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात
त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. विशेषतः
चव्हाण गेल्या 15 वर्षांत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्या
कार्यकाळापासून आजपर्यंत जवळजवळ सर्वच आयुक्तांकडे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून काम पाहिले आहे.
महानगरपालिके तील प्रशासकीय कामकाज, विकास प्रकल्पांचे नियोजन, तांत्रिक अंमलबजावणी आणि समन्वय या क्षेत्रांत त्यांचा अनुभव दांडगा मानला जातो. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यास मदत झाली आहे.
मुख्य अभियंता पदाची
जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबईतील पायाभूत सुविधा, नागरी विकास, रस्ते, जलनिस्सारण आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या यशामुळे भादवण गावासह ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
या नियुक्तीबद्दल भादवण ग्रामस्थ, सहकारी अधिकारी आणि मुंबईकरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
Comments
Post a Comment