सलीम मासूलदार यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर

सलीम मासूलदार यांना आदर्श शिक्षक  महापौर पुरस्कार जाहीर
मुंबई : सलीम मासुलदार यांना यंदाचे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर झाले ही खूप गौरवाची  अभिमानाची गोष्ट आहे. सलीम मासूलदार हे एका खेडे गावात शिक्षण घेऊन स्वतःच्या जिद्दीवर मुंबई महानगरपालिका येथे शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर जिद्दीने आपली सेवा करत त्यांनी मागील सोळा वर्षांमध्ये अतिशय उल्लेखनीय शैक्षणिक सामाजिक कार्य करून नुकतेच झालेले आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराच्या मुलाखतीमध्ये त्यांनी उत्तमरीत्या आपली  मुलाखत देऊन यश मिळविले. यासाठी त्यांना शिक्षण खात्यातील अनेक अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक इतर सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छा मिळत आहेत. शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा खाजगी अनुदानित व विनाअनित प्राथमिक शाळा मधील जे शिक्षक ज्ञानधानाचे व विद्यार्थी घडवण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत त्यांच्या यथोचित गौरव करण्याची परंपरा सन 1971 पासून सुरू आहे या परंपरेत  दरवर्षी 50 शिक्षकांना "महापौर पुरस्काराने" गौरविण्यात येते. दिला यामध्ये माध्यमिक शाळेतून सलीम मासुलदार यांचीनिवड झाली आहे यासाठी 11000 बक्षीस  मान चिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र शाल श्रीफळ व फेटा प्रदान करून सन्मानित केले जाणार आहेत हा कार्यक्रम मोठ्या सन्मानाने आयोजित करण्यात येणार . यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक भूषण गगराणी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, शिक्षणाधिकारी सुजाता खरे उपशिक्षणाधिकारी मुख्तार शहा आदी मान्यवर पत्रकार सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती