युनिव्हर्सल एज्युकेशन अकेडमीचे संस्थापक अध्यक्ष कालकथित दादासो माधवराव अनंतराव वाघ याना भावपूर्ण आदरांजली
युनिव्हर्सल एज्युकेशन अकेडमीचे संस्थापक अध्यक्ष कालकथित दादासो माधवराव अनंतराव वाघ याना भावपूर्ण आदरांजली
चाळीसगांव: नालंदा विद्यालयात युनिव्हर्सल एज्युकेशन अकेडमीचे संस्थापक अध्यक्ष कालकथित दादासो माधवराव अनंतराव वाघ यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणमहर्षी कालकथित दादासो माधवराव अनंतराव वाघ यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त विद्यालयात प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कालकथित दादासो माधवराव अनंतराव वाघ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व आदरणीय मुख्याध्यापक शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या उभारणीत आणि विद्यालयाच्या प्रगतीमध्ये कालकथित दादासो माधवराव अनंतराव वाघ यांचे योगदान अनमोल आहे. त्यांनी लावलेल्या ज्ञानरुपी रोपट्याचे आज विशाल वृक्षात रूपांतर झाले असून, अनेक विद्यार्थी त्यांच्या दूरदृष्टीमुळे घडत आहेत. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून उपस्थित सर्वांनी त्यांना आदराने वंदन केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी झेड रावते सर व ज्येष्ठ शिक्षक श्री. एम. एन. पाटील सर यांनी प्रतिमा पुजन करून दादांच्या कार्याचा गौरव केला.
Comments
Post a Comment