उषा जायस्वाल यांना प्रथम पारितोषिक
उषा जायस्वाल यांना प्रथम पारितोषिक
मुंबई: आज दि.२९एप्रिल ,२०२५ रोजी प्रेरणा सभागृह , आजाद मैदान पोलीस स्टेशन(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हीडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हास्तरीय मुंबई उपनगर गट १ ली व२री विषय भाषा प्रथम क्रमांक पास्पोली विलेज मनपा हिंदी स्कूल नं.१ ची शिक्षिका उषा रमेश जायस्वाल यांना शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ ,सुजाता खरे, मनीषा पवार (प्राचार्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई) आणि वैशाली काकडे यांच्या हस्ते देण्यात आले.या प्रसंगी श्रीमती जायस्वाल यांच्या मुख्याध्यापक विनोद कुमार पासी व शाळा परिवारा तर्फे अभीनंदन करण्यात आले.
Comments
Post a Comment