माजी विद्यार्थ्यांनी दिली भेट
माजी विद्यार्थ्यांनी दिली भेट.
मुंबई :क.दा.गायकवाड नगर म.न.पा.हिंदी शाळा क्र-1 चे वरिष्ठ शिक्षक नामदेव धनकुटे सर यांनी शिकवलेल्या सन् 2010 च्या इयत्ता 7 वी च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या लाडक्या सरां सोबत 'गेटटुगेदर' चा कार्यक्रम साजरा केला.
नामदेव धनकुटे सरांनी शिकवलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
आजच्या गेटटुगेदर कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांचे आशीर्वाद घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. आजच्या घडीला इयत्ता 8 वी च्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याची सूचना दिली. आपल्या आवडीचे क्षेत्र आत्ताच निवडून ते ध्येय पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत,अशा सूचना केल्या. आईवडील आणि गुरू यांच्या प्रति आदर बाळगला पाहिजेत असे भावनाप्रधान उद्गार काढून सर्वजण भावूक झाले.
शेवटी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या गुरुजनांसोबत आनंदाने स्नेहभोजनाचा आनंद घेतला सोबत गुरूजनांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.शेवटी 'सर पुन्हा भेटू व भविष्यात अजून चांगले कार्य करू' असे आश्वासन देऊन सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांचा निरोप घेतला.
Comments
Post a Comment