जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त*"माझी मुंबई" या संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा
*जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त*
"माझी मुंबई" या संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा
रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत मुंबईतील विविध मैदाने / उद्याने येथे आयोजित केली होती.एफ/दक्षिण विभागातील स्पर्धेचे आयोजन प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगण ,शिवडी येथे प्रशासकीय अधिकारी ( शाळा) श्रीम.राजकुमारी गिरि,कनिष्ठ पर्यवेक्षक श्री.सुभाष डोफे,प्रभारी विभाग निरीक्षक श्रीम. अंजली जोगी व श्रीम.प्रियंका दुधसागरे यांच्या नियोजनात आयोजित केली होती.सदर स्पर्धेत मनपा शाळेच्या 791 व खाजगी शाळांच्या 803 विद्यार्थी अशाप्रकारे एकुण 1594 विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.सदर स्पर्धेस सन्म.उपशिक्षणाधिकारी श्री. अजय वाणी व कला अकादमीच्या निदेशक श्रीम.प्रफुल्लता कुंभार यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे खाऊ व पाण्याची सोय करण्यात आली होती.प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे चित्र काढण्याचा आनंद लुटला अशाप्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन स्पर्धा संपन्न झाली.
Comments
Post a Comment