श्रवण सुखाशी झालो पारखे,**तरीही आम्ही आहोत तुमच्यासारखे!*
*श्रवण सुखाशी झालो पारखे,*
*तरीही आम्ही आहोत तुमच्यासारखे!*
स्वर्गीय स्वरांना ऐकण्यास ते अपयशी ठरतात!
त्यांच्या श्रवणयंत्रणेने बंड पुकारलेलं असतं!
पंचेंद्रियांपैकी श्रवणेंद्रिय त्यांच्यावर रुसून बसलेलं असतं!
त्यांच्यात न्यून नसतं काही पण श्रवणेंद्रियच संपावर गेलेले असतं!
कर्णबधिरांमध्ये दिव्यांगत्व हे अदृश्य व्यंग असतं!
माझगाव, मुंबई येथे कर्णबधिर दिव्यांगांची पहिली शाळा १९८३ मध्ये स्थापन झाली.
काही का होईना पण दिव्यांगांना शिकण्याची संधी उपलब्ध झाली.
कौटुंबिक अनुवांशिकतेमुळे कर्णबधिरत्व येऊ शकतं.
काही पर्यावरणीय घटकही याला कारणीभूत ठरू शकतात.
कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजाच्या सान्निध्यात काही महिने किंवा काही वर्षे राहिल्याने कर्णबधिरत्व येऊ शकते.
लवकर निदान झाले तर संपूर्णपणे कर्णबधिर होण्यापासून काही प्रमाणात वाचवता येते.
कर्णबधिरत्व असलेल्यांसाठी शिक्षण ही मोठी समस्या आहे.
आशा लोकांना नोकऱ्या मिळणे काहीसे कठीण आहे.
त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काहीसा वेगळा असतो.
हल्ली स्मार्टफोनमुळे चित्रांच्या माध्यमातून पाहून थोडेफार शिकता येते.
कर्णबधीरांसाठी सांकेतिक भाषा वरदान ठरत आहे!
अशा लोकांना माणुसकीने मागवण्यात यावे.
जे अल्प कर्णबधीर आहेत,त्यांच्याशी बोलताना मोठ्याने बोलणे अपेक्षित असते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचं वरदान यामध्ये किती बदल घडवून आणते ते पाहूया!
आजच्या जागतिक कर्णबधिरदिनी आपणही काळजी घ्यावी आणि कर्णबधीरांचीही काळजी घ्यावी.
रचयिता:© रवींद्र काळे
रवि२९०९२०२४
९८३३७७०७३९
*(या रचनेचे सर्वाधिकार _रचयिता © रवींद्र काळे_ यांच्या कडेच आहेत.रचना पुढे पाठवायची असल्यास ती रचयित्याच्या नावासहितच पुढे पाठवावी.रचयित्याचे नाव काढून नुसती रचना,तसेच रचयित्याचे नाव काढून, स्वतःचे नाव टाकून रचना पुढे पाठवू नये.)*
रचना व सजावट कालावधी:सु.६५ मिनिटे.
छायाचित्रे सौजन्य: गूगल.
Comments
Post a Comment